सुबोध जावडेकर - लेख सूची

मेंदू-विज्ञान लिहीत आहे उद्याचे नीतिशतक

मेंदूनीतिशास्त्र (Neuroethics) ही अगदी अलिकडे, म्हणजे एकविसाव्या शतकात उदयाला आलेली नवीन ज्ञानशाखा. ही इतकी नवीन आहे की ‘मेंदूनीतिशास्त्र’ या शब्दाची सर्वमान्य अशी औपचारिक व्याख्यासुद्धा अजून तयार झालेली नाही. नीतीनियमांशी निगडित असलेले मेंदू-विज्ञानातले प्रश्न, मेंदूवरील संशोधनातून उद्भवणाऱ्या समस्यांची कायदेशीर अंगे आणि त्यांचा समाजावर होऊ शकणारा परिणाम या सर्वांचा विचार मेंदूनीतिशास्त्रात केला जातो. मेंदूच्या रोगांवर उपचार करताना …